उत्तर सिक्कीममध्ये भारतीय लष्कर आणि पीपल्स लिबरेशन आर्मी दरम्यान हॉटलाइनची सुरुवात

उत्तर सिक्कीममध्ये भारतीय लष्कर आणि पीपल्स लिबरेशन आर्मी दरम्यान हॉटलाइनची सुरुवात

सीमांवर विश्वास आणि सौहार्दपूर्ण संबंधांची भावना वाढवण्याच्या दृष्टीने, उत्तर सिक्कीममधील कोंगरा ला येथे भारतीय लष्कर आणि आणि तिबेटी स्वायत्त प्रदेशातील खंबा झोंग येथे पीएलए दरम्यान हॉटलाइनची सुरुवात करण्यात आली. 01 ऑगस्ट 2021 रोजी पीएलए दिनानिमित्त हा कार्यक्रम झाला.

दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांनी ग्राउंड कमांडर स्तरावर संपर्कांसाठी चांगली यंत्रणा स्थापित केली आहे. या विविध क्षेत्रातील या हॉटलाईन्स सीमेवर शांतता आणि शांतीपूर्ण वातावरण राखण्यासाठी आणि संपर्क वाढविण्यासाठी दीर्घकाळासाठी महत्वाच्या आहेत.

उद्घाटनाला दोन्ही सैन्यदलाचे ग्राउंड कमांडर उपस्थित होते आणि हॉटलाईनद्वारे मैत्री आणि सौहार्दाचा संदेश परस्परांना देण्यात आला.

Related Stories

No stories found.