मोटार वाहन कागदपत्रांच्या वैधतेला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मोटार वाहन कागदपत्रांच्या वैधतेला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या या निर्णयाचा नागरिकांना वाहतुकीसंबंधी सेवा घेताना लाभ होईल|

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायदा-1988 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 अंतर्गत वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी किंवा इतर कागदपत्रांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे|

मंत्रालयाने यापूर्वी 30 मार्च आणि 9 जून रोजी मोटार वाहन कायदा-1988 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 अंतर्गत मुदतवाढीची सूचना प्रसिद्ध केली होती| त्यात फिटनेस, परमिट (सर्व प्रकार), परवाना, नोंदणी किंवा इतर संबंधित कागदपत्रांची वैधता 30 सप्टेंबर 2020 असल्याचे सांगितले होते|

देशभरातील कोविड-19 संक्रमण परिस्थिती पाहता, वर निर्देशित केलेली कागदपत्रे ज्यांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 रोजी संपली आहे किंवा 31 डिसेंबर 2020 रोजी संपणार आहे, त्या सर्वांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे| अंमलबजावणी अधिकाऱ्यांना अशी कागदपत्रे 31 डिसेंबर 2020 पर्यंत वैध असल्याचे सांगण्यात आले आहे|

Related Stories

No stories found.
logo
The News Agency
www.thenewsagency.in