विजयादशमीच्या निमित्ताने आयुध निर्माण कारखाना मंडळाच्या सात नवीन संरक्षण कंपन्या राष्ट्राला समर्पित

विजयादशमीच्या निमित्ताने आयुध निर्माण कारखाना मंडळाच्या सात नवीन संरक्षण कंपन्या राष्ट्राला समर्पित

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर (TNA) 15 ऑक्टोबर 2021 रोजी नवी दिल्ली ये थे 'विजयादशमी' च्या निमित्ताने संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आयुध निर्माण कारखाना मंडळाच्या (ओएफबी) सात नवीन संरक्षण कंपन्या राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमादरम्यान दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोठारी सभागृह, डीआरडीओ भवन येथे झालेल्या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवले|

कार्यान्वयन स्वायत्तता, कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि नवीन वृद्धीसाठी वाव आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने आयुध निर्माण कारखाना मंडळाचे रूपांतर सात पूर्णपणे सरकारी मालकीच्या कंपन्यांमध्ये करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता|

त्यानुसार मुनीशन्स इंडिया लिमिटेड (MIL); आर्मर्ड वेहिकल्स निगम लिमिटेड (AVANI), एडव्हान्स्ड वेपन्स अँड इक्विपमेंट इंडिया लिमिटेड (AWE India); ट्रूप कम्फर्ट लिमिटेड (TCL); यंत्र इंडिया लिमिटेड (YIL); इंडिया ओप्टेल लिमिटेड (IOL); आणि ग्लाईडर्स इंडिया लिमिटेड (GIL) या कंपन्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या कंपन्यांनी 01 ऑक्टोबर 2021 पासून व्यवसाय सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.
The News Agency
www.thenewsagency.in