राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनीने मुंबईतील ट्रॉम्बे युनिटमध्ये मिथेनॉल प्लांट सुरू केला
Vernacular

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनीने मुंबईतील ट्रॉम्बे युनिटमध्ये मिथेनॉल प्लांट सुरू केला

Team TNA

Team TNA

नवी दिल्‍ली || राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड -आरसीएफने रसायन आणि खते मंत्रालयांतर्गत 8 सप्टेंबर 2020 पासून मुंबईच्या ट्रॉम्बे युनिटमध्ये मिथेनॉल प्लांट सुरू केला आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या दिशेने हे एक पाऊल आहे|

आरसीएफकडे दररोज 242 मेट्रिक टन मेथॅनॉल तयार करण्याची क्षमता आहे. आत्तापर्यंत, आरसीएफ त्याच्या अंतर्गत वापरासाठी आणि व्यापारिक उद्देशाने देखील मिथेनॉल आयात करत होते. स्वत: च्या मिथेनॉल उत्पादनामुळे, आरसीएफ यापुढे स्वतःच्या आवश्यकतेसाठी आयातीवर अवलंबून राहणार नाही आणि मिथेनॉलवर अवलंबून असलेल्या अन्य उद्योगांच्या गरजा भागवण्याच्या स्थितीत देखील असेल|

यासह आरसीएफने देशातील मेथनॉल उत्पादकांच्या निवडक यादीमध्ये प्रवेश केला असून आयातीला पर्याय उपलब्ध करून देतानाच सरकारच्या महत्वाकांक्षी 'आत्मनिर्भर भारत' अभियानात योगदान देत आहे|

मिथेनॉलचा वापर फार्मास्युटिकल्स, कीटकनाशके, डायस्टफ इत्यादी उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जात आहे. अत्यंत मर्यादित देशांतर्गत उत्पादनामुळे आतापर्यंत ही गरज आयातीच्या माध्यमातून भागवली जात होती|

खतांमध्ये स्वयंपूर्णतेला पाठिंबा देण्याच्या प्रयत्नात, आरसीएफने सुफला 15:15:15 या सुप्रसिद्ध खताचे उतपादन प्रतिदिन 1500 मे.टन वरून 2200 मे टन पर्यंत वाढवले आहे. परिणामी, सुफलाच्या उत्पादनात ऑगस्ट 2019 च्या तुलनेत ऑगस्ट 2020 मध्ये 17.3% वाढ झाली|

प्रचलित कोविड -19 महामारीच्या काळात, उत्पादन आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनासह दररोजच्या अनेक अडचणींचा सामना करूनही आरसीएफ ऑगस्ट 2019 च्या तुलनेत ऑगस्ट 2020 मध्ये खतांच्या विक्रीत 10.81 टक्क्यांची वाढ नोंदवू शकला आहे|

The News Agency
www.thenewsagency.in