मुंबई उच्च न्यायालयात 4 नवीन अतिरिक्त न्यायाधीशांची नेमणूक

मुंबई उच्च न्यायालयात 4 नवीन अतिरिक्त न्यायाधीशांची नेमणूक

मुंबई || भारतीय राज्य घटनेच्या कलम 224 च्या उपकलम (l) ने बहाल केलेल्या अधिकारांचा वापर करत राष्ट्रपतींनी राजेश नारायणदास लड्ढा , संजय गणपतराव मेहरे, गोविंद आनंद सानप आणि शिवकुमार गणपतराव दिगे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक केली|

ही नेमणूक त्यांच्या संबंधित कार्यालयांचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी असेल| यासंदर्भातील अधिसूचना कायदा व न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाने आज जारी केली|

Related Stories

No stories found.
logo
The News Agency
www.thenewsagency.in