File Photo
File Photo
Vernacular

वाई दल प्रमुखांची (CAS) पूर्व हवाई विभागातील सीमेवरच्या हवाईतळांना भेट

Team TNA

Team TNA

नवी दिल्ली || हवाईदल प्रमुख (CAS) एअर चीफ मार्शल, आर के एस भदौरीया यांनी काल म्हणजेच 2 सप्टेंबर 2020 रोजी पूर्व हवाई विभागातील सीमेवरच्या हवाईतळांना भेट दिली|

पूर्व हवाई विभागात हवाई दलांचे आगमन झाल्यावर, या विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, त्यांच्या विभागाच्या अखत्यारीतील तुकड्यांची सद्यस्थिती आणि ऑपरेशनविषयक सज्जता, याविषयी माहिती दिली|

हवाईदलप्रमुखांनी यावेळी, या तुकड्यांमधील हवाईयोद्ध्यांचीही भेट घेतली. प्रत्येक भूमिका आणि कर्तव्ये कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी या कर्मचाऱ्यांचे निश्चित ध्येय घेऊन प्रयत्न सुरु असल्याबद्दल हवाई दल प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले| आणि भविष्यातही अशाच चिकाटीने कर्तव्य पार पडत राहावे, असे आवाहन केले|

The News Agency
www.thenewsagency.in